जलालखेडा येथे देशी दारू दुकान समोरच होते अवैध दारू विक्री
प्रतिनिधी:साजिद पठान नागपुर
जलालखेडा (त.23) जलालखेडा येथील शासकीय देशी दारू दुकाना समोर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे.शासकीय देशी दारूचे दुकान उघडण्याची वेळ सकाळी 8 तर रात्री 10 पर्यंत आहे.परंतु सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत देशी दारू दुकान परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.अवैध दारू विक्री करण्यासाठी पोलिसांना हप्ता दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.एक दोन पोलिसांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात या परिसरात अवैध दारू विक्री सुर असल्याचे दिसत आहे.जलालखेडा पोलिस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांनी तातडीने कार्यवाही करून यामध्ये दोषी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी होत आहे.पोलिस स्टेशन पासून देशी दारूचे दुकानं फक्त 300 मिटर अंतरावर असून सुद्धा पोलिसांना या बाबत माहिती नाही ही आश्चर्याची बाब आहे. जलालखेडा येथून मोटार सायकलने इतर जिल्ह्यात दारूची अवैध वाहतूक केल्या जात आहे.असे असताना सुद्धा पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे.अवैध दारू विक्रेता बिनधास्त दारू विक्री करत आहे त्यामुळे जलालखेडा पोलिस अवैध दारू विक्री करणाऱ्याला मदत करत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या दारू मुळे कित्येक महिलांचे संसार उध्वस्त झाले आहे.जलालखेडा येथे देशी दारूचे परवाना असेली दोन दुकाने असून सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू विक्री होत आहे त्यामुळे झगडे भांडणाचे प्रमाण वाढले आहे.शासकीय सुट्टी च्या दिवशी शासकीय दारूचे दुकान बंद असल्याने या अवैध देशी दारू विक्री चे प्रमाण जास्त असते व जास्त भावात विकण्यात येते हा सगळा प्रकार पोलिस कर्मचाऱ्याला माहित असून काही पैसे घेऊन माहित नसल्या सारखे करत आहे अशी माहिती सूत्र कडून मिळाली आहे नवं नियुक्त ठाणेदार पोलिस कर्मचाऱ्यावर व अवैध देशी दारू विक्रेत्यांवर काय कार्यवाही करतात या वर सर्वांचे लक्ष लागले आहे.